vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी तात्काळ आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.

 दि ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत लाभार्थ्यांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड तयार करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्यानुसार दि. ४ डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बीसीएम व पीएमजेएवाय समन्वयकांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.आयुष्मान कार्ड का महत्त्वाचे?अनेक पात्र लाभार्थ्यांनी वेळे अभावी किंवा माहिती अभावी आपले कार्ड काढलेले नाही. त्यामुळे शासनाच्या महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेचा त्यांना लाभ न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुष्मान कार्डाद्वारे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होते.

‘या’ मोफत सेवा:– वार्षिक ५ लाखांपर्यंत उपचार खर्च- शस्त्रक्रिया, हॉस्पिटलायझेशन व औषधोपचार कॅन्सर, हृदयविकार, मूळव्याध, मोठ्या शस्त्रक्रिया यांसह गंभीर आजारांचे उपचार- जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शासन व खाजगी रुग्णालयांमध्ये सेवांचा लाभआयुष्मान कार्ड कसे व कुठे बनवावे?आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र नागरिकांनी जवळच्या सेवा केंद्रात, सरकारी रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात, किंवा नोंदणीकृत आयुष्मान आरोग्य केंद्रात जाऊन तात्काळ आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-१. आधार कार्ड २. रेशन कार्ड (असल्यास)“आयुष्मान कार्ड काढून घ्या आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य व आर्थिक संरक्षण सुनिश्चित करा,” असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा,कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर