vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

 

लातूर, प्रतिनिधी: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. यामुळे विभागात नवीन ९६५ पदांच्या निर्मितीने मंजूर पदांची संख्या वाढून ३ हजार ९५२ झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागामध्ये ९६५ नवीन पदांची निर्मिती करून एकूण ३ हजार ९५२ पदांचा नवा आकृतीबंध ४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे. यात विद्यमान ३,०९४ मंजूर पदांपैकी १०७ पदे रद्द करण्यात आली आहेत.

    नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची निर्मिती, दस्त संख्येत झालेली वाढ आणि वाढलेली कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. सुधारित आकृतीबंध विभाग अधिक सक्षम, कार्यक्षम आणि बळकट करण्यास उपयुकत ठरणार आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे शासनाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इष्टांकपूर्तीत सहाय्य होऊन राज्य महसूल वाढीस चालना मिळेल. तसेच नागरिकांना अधिक जलद व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीतही या निर्णयामुळे महत्त्वाची भर पडेल, असा विश्वास नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी व्यक्त केला.

        नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण विभाग असून आकृतीबंधातील सुधारणेची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती असेही त्यांनी नमूद केले.

 

*****

संबंधित पोस्ट

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह आदींच्या सद्यस्थितीचा अहवाल सात दिवसात द्या – पालकमंत्री पंकजा मुंडे- शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश- आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 14 एप्रिलला ‘कोरडा दिवस’; मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई अनुदानअनियमितता प्रकरणी चौकशी सुरू- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव