vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

नागपूर, प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही, संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या. संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे. संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

      विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड.आशिष शेलार, विधानमंडळ सचिव मेघना तळेकर आदी उपस्थित होते.

    संसदीय अभ्यासवर्ग लोकशाहीची ओळख करून देणारा वर्ग आहे. पुस्तकी अभ्यासक्रमांमध्ये आपण लोकशाहीची मूल्ये, प्रक्रिया वाचतो. अभ्यासवर्गात मात्र ही प्रक्रिया जवळून बघता येते. राज्याचा कारभार कसा चालला पाहिजे याचा नियम संविधानाने दिला. विधानसभा आणि विधानपरिषद या दोनही सभागृहाचे नियम, त्यातील एक एक शब्द, तरतूद संविधानाच्या आधारावरच झाली आहे. विधानमंडळाच्या कामकाजाची सुंदर रचना संविधानाने दिली, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले

      विधानमंडळात वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले जातात. हे कायदे लोकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करणारे असतात. कायदे तयार होत असतांना सभागृहात होत असलेली चर्चा गुणात्मक असते. राज्यातील शेवटच्या माणसावर एखाद्या कायद्याचा काय परिणाम होईल, याची बाजू देखील सभागृहात मांडली जाते. विधानमंडळाच्या मंजुरीशिवाय राज्याच्या तिजोरीतील एक रुपया देखील खर्च होऊ शकत नाही. विभागांना आपल्या मागण्या सभागृहासमोर ठेवाव्या लागतात. त्यावर चर्चा होते, मान्यतेनंतर अर्थसंकल्प तयार होतो आणि त्यानंतर कायदा तयार करावा लागतो. हा कायदा म्हणजे राज्याच्या तिजोरीची चावी आहे, असे श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

     राज्यातील एखाद्या छोट्या घटनेचे पडसाद देखील विधिमंडळात उमटत असतात. लोकशाहीची प्रक्रिया विधिमंडळाच्या कामामुळे जीवंत राहते. सभागृहातील सभापती, अध्यक्ष आमचे हेडमास्टर आहेत, त्यांच्या मंजुरीशिवाय सभागृहात कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. संसदीय लोकशाहीत विविध प्रकारची आयुधे आहेत. ही आयुधे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाची साधने आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..