vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात..

मुंबईत दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात..

प्रतिनिधी  : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पुन्हा लसीकरणाला (COVID-19 vaccination) सुरुवात झाली झाली आहे. काल राज्याला 21 लाख लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा प्रत्येक केंद्रावर वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईकर लसीकरणासाठी जाऊ शकतात.

लसीच्या डोसच्या कमतरतेमुळे दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत शनिवारी (21 ऑगस्ट, 2021) महापालिकेने आपली कोविड -19 लसीकरण मोहीम पुन्हा सुरू केली आहे. गुरुवारी रात्री 1,60,000 पेक्षा जास्त डोस मिळाल्यानंतर शहरात कोरोनाव्हायरस लस देणे सुरु झाले आहे. ही लस शुक्रवारी सर्व सरकारी आणि नगरपालिका लसीकरण केंद्रांमध्ये वितरित आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या मते, कोविशील्डचे 1,50,000 डोस आणि कोवॅक्सिनचे 10,240 डोस मिळाले आहेत. बीएमसीने मुंबईतील कोविड लसीकरण केंद्रांची (सीव्हीसी) यादी शेअर केली आहे यानुसार शनिवारी लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 4,365 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी मुंबईत 322 संक्रमणाची नोंद झाली आहे. राजधानीची सक्रिय संख्या आता 2,853 झाली आहे, तर राज्यात ती 55,454 आहे.

संबंधित पोस्ट

लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :-प्रशासन प्रमुख आज साधणार मतदारांशी संवाद सहभाग नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योग विभाग आणि लुब्रिझोल इंडिया दरम्यान सामंजस्य करार; १२० एकर जागेचे वाटपपत्र सुपूर्द‘लुब्रिझोल’च्या बिडकीन येथील प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मिती-उद्योग मंत्री उदय सामंत

२०३४च्या फुटबॉल विश्वचषकासाठी ‘प्रोजेक्ट महादेवा’ मधून गुणवान खेळाडू मिळतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*