vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

 

नवी मुंबई प्रतिनिधी –

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहिता कालावधीत सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांच्या निवडणूकविषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे आणि इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
काल 15 डिसेंबर रोजी सायंकाळपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अनाधिकृत बॅनर्स विरोधात धडक मोहीम हती घेण्यात आली असून महानगरपालिकेच्या मालमत्तांवरील उद्घाटन – भूमिपूजनाच्या कोनशिला तसेच राजकीय व्यक्तींची नावे असलेले फलक झाकून घेण्यात येत आहेत. सदर कार्यवाही 48 तासात काटेकोरपणे पूर्ण करावी व तशाप्रकारचा अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
निवडणूक 30 दिवसांनी असल्याने या कालावधीत निवडणूकीच्या कामाला संपूर्ण प्राधान्य द्यावे असे निर्देशित करतांनाच मतदान केंद्रांच्या जागांची पुनर्पाहणी करावी असे सूचित करण्यात आले. मतदान केंद्रांवर पुरविण्याच्या सुविधांकडेही बारकाईने लक्ष द्यावे व सर्व मतदान केंद्रांचे जिओ टॅगींग करुन घ्यावे म्हणजे त्याचा उपयोग नागरिकांसह सर्वांनाच होईल अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
डिस्ट्रिक इलेक्शन प्लॅन सारखा वॉर्ड इलेक्शन प्लॅन तयार करावा जेणेकरुन त्यातील टेम्प्लेटनुसार प्रत्येक बाबनिहाय कार्यवाही करणे व ती पूर्ण झाल्याची खात्री करणे सोयीचे ठरेल असे सूचित करतांनाच आयुक्तांनी दुबार मतदार यादीची पाहणी करण्याचे काम जलद व अचूक पूर्ण करावे असे निर्देश दिले.
निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन, मतदान केंद्रावरील सुविधा तसेच मतदार यादी या बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करतांनाच आयुक्तांनी प्रत्येक विभाग अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी यांच्याशी समन्वय राखावा आणि निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्याकडे लक्ष द्यावे असे निर्देश दिले.
निवडणूकीच्या अनुषंगाने संबधित इतर प्राधिकरणांचे अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करण्यात आले असून राजकीय पक्ष प्रतिनिधी व प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्याशीही आयुक्त डॉ. कैलास शिंदे संवाद साधणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनात पदांना मान्यता, दोन वसतीगृहे आणिस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार…

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी‘महाकुंभा’ची निर्मिती करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज मानधन योजना ;जेष्ठ साहित्यिक, कलावंतांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतून १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात नागरिकांनी भीती बाळगू नये; काळजी घ्यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश