vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर  मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात तीन दिवसांत  40 गुन्हे दाखल.

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर  मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात तीन दिवसांत  40 गुन्हे दाखल.

मुंबई प्रतिनिधी : जन आशीर्वाद यात्रा: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील तीन दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी 40 गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये, गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस मुंबई आणि उपनगरात विविध ठिकाणी गेलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी, आग्रीपाडा, सहार विमानतळ, काळाचौकी, शीव, आझाद मैदान, गावदेवी, मुलुंड, पवई, एमआयडीसी, मेघवाडी, गोरेगाव, चारकोप, बोरीवली आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 40 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

संबंधित पोस्ट

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांकडून MSRTC चे आणखी काही कर्मचारी ताब्यात

टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

vishwatmaklokswamivarta

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे नेते आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांचे दीर्घ आजाराने  निधन..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप