vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

बुलढाणा, प्रतिनिधी : लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी यांनी विजय मिळवला असून या निकालामुळे नगरपरिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषदेत एकूण २० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ५, भाजपचा १, अपक्ष ५ तर इतरांमध्ये एमआयएमचा एक सदस्य निवडून आला आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मीरा भूषण मापारी यांनी ६ हजार ४६७ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक १ अ मधून अपक्ष उमेदवार हुमेरा सदफ शेख जमील यांनी ८१३ मते तर १ ब मधून अपक्ष अ. उबेद अ. मुनाफ यांनी ७१० मते मिळवून सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून एमआयएमच्या शेख नगमा बी शेख जावेद यांनी ७६७ मते तर २ ब मधून शिवसेनेचे शेख मकसुद शेख उस्मान यांनी ५९१ मते मिळवत विजय मिळवला आहे

प्रभाग क्रमांक ३ अ मधून काँग्रेसच्या मापारी वर्षा संतोष यांनी ९४० मते तर ३ ब मधून शिवसेनेचे गजानन शालिकराम मापारी यांनी ६९५ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून काँग्रेसच्या सीमा नितीन शिंदे यांनी १ हजार ३१२ मते तर ४ ब मधून काँग्रेसचे आबेद खान मोमीन खान यांनी १ हजार २७१ मते मिळवत विजय संपादन केला आहे

प्रभाग क्रमांक ५ अ मधून अपक्ष गुलाबराव चंद्रभान सरदार यांनी ५०० मते तर ५ ब मधून भाजपच्या शोभा भागवत देसाई यांनी ४४६ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ६ अ मधून काँग्रेसच्या संध्या शाम राऊत यांनी २३२ मते तर ६ ब मधून शिवसेनेचे अक्षय नंदकुमार इंगळे यांनी १८९ मते मिळवत विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ७ अ मधून काँग्रेसच्या वंदना अरुण जावळे यांनी ७१५ मते तर ७ ब मधून शिवसेनेचे मयुर रमेशचंद्रजी गोलेच्छा यांनी ४१८ मते मिळवून सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून काँग्रेसच्या अनिकेत राजेश मापारी यांनी ४०० मते तर ८ ब मधून शिवसेनेच्या सुप्रिया गजानन मापारी यांनी ४२५ मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून अपक्ष साहेबराव मारोती पवार यांनी ४८५ मते तर ९ ब मधून काँग्रेसच्या जुबेदा रमजान परसूवाले यांनी ७३६ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.प्रभाग क्रमांक १० अ मधून अपक्ष पायल शुभम भगत यांनी ४८८ मते तर १० ब मधून काँग्रेसचे पंढरी पुंजाजी चाटे यांनी ४०९ मते मिळवून विजय संपादन केला आहे.

000

संबंधित पोस्ट

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा”या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

जनाई उपसा सिंचन योजनेच्या रायझिंग ते बोरकरवाडी तलावापर्यंतच्या पाईपलाईनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची पाहणी स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta