vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जळगाव जामोद नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे गणेश दांडगे विजयी भाजपचे ९, काँग्रेसचे ५ सदस्य

जळगाव जामोद नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे गणेश दांडगे विजयी भाजपचे ९, काँग्रेसचे ५ सदस्य

बुलढाणा, प्रतिनिधी) : जळगाव जामोद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे गणेश रामेश्वर दांडगे विजयी झाले. नगरपरिषदेत एकूण २१ सदस्य असून त्यापैकी भाजपचे ९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे २ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय एक अपक्ष सदस्य असून इतर पक्षांमध्ये एमआयएमचे २ तर समाजवादी पार्टीचा एक सदस्य विजयी झाला आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत भाजपला सर्वाधिक संख्याबळ मिळाले आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गणेश रामेश्वर दांडगे यांनी ७५८० मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपच्या पुष्पा प्रभाकर अंबाडकर यांनी ६८३ मते मिळवून सदस्यपद पटकावले तर प्रभाग क्रमांक १ ब मधून अपक्ष मोहम्मद सलीम मोहम्मद शब्बीर यांनी ४५६ मते मिळवत विजय संपादन केला आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे सिद्धार्थ गजानन हेलोडे यांनी ८७६ मते तर २ ब मधून एमआयएमच्या वाजेदा अजुम अब्दुल जहीर यांनी ५७० मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे

प्रभाग क्रमांक ३ अ मधून भाजपच्या रुपाली संतोष डोबे यांनी १ हजार १०३ मते तर ३ ब मधून भाजपचे कैलास मोतीराम पाटील यांनी ७९९ मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून सपाचे सैय्यद नफीस सैय्यद शफी यांनी ९७४ मते तर ४ ब मधून काँग्रेसच्या फरजाना बी सैय्यद अफरोज यांनी ८०८ मते मिळवत सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ५ अ मधून भाजपचे राजु मारोती हिस्सल यांनी ६०१ मते तर ५ ब मधून भाजपच्या प्रियंका उमेश येऊल यांनी ९५१ मते मिळवून यश संपादन केले आहे.

प्रभाग क्रमांक ६ अ मधून एमआयएमचे शेख गुलाब शेख भिकारी यांनी ६६४ मते तर ६ ब मधून भाजपच्या लता कृष्णराव तायडे यांनी ८२० मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपचे सुनिलसिंग राजपालसिंग रघुवंशी यांनी ६४० मते तर ७ ब मधून काँग्रेसच्या वैशाली निलेश तायडे यांनी ७६३ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून काँग्रेसच्या मिना राजेश सातव यांनी ८४७ मते तर ८ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे खान इरफान हमीद यांनी ६०९ मते मिळवत विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ९ अ मधून काँग्रेसच्या संगीता विलास भारसाकळे यांनी ८११ मते तर ९ ब मधून भाजपचे परमानंद करणसिंग राजपूत यांनी ६०४ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक १० अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस मोहम्मद अतिकुर रहमान मोहम्मद अर्शद यांनी ७३३ मते तर १० ब मधून भाजपच्या खान शिरन खानम शाकिर खान यांनी ९७८ मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १० क मधून काँग्रेसच्या समिना परविन शाकीर खान यांनी ९६४ मते मिळवत सदस्यपद पटकावले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

JNU : राम नवमीची पूजा की मांसाहार?; जेएनयूमधील कावेरी वसतिगृहात काय घडलं?

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबई न्यायालयाचा नवाब मलिक यांना दिलासा, उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्याची दिली परवानगी