vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व…

चिखली नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे पंडितराव देशमुख; भाजपचे वर्चस्व…

बुलढाणा, प्रतिनिधी : चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे पंडितराव रामराव देशमुख विजयी झाले असून नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगरपरिषदेत एकूण २८ सदस्य असून त्यापैकी भाजपचे १३ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १२ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंडितराव रामराव देशमुख यांनी १६ हजार २३० मते मिळवत विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपच्या सुषमा विलास चव्हाण यांनी १ हजार ३१६ मते मिळवून सदस्यपद पटकावले, तर प्रभाग क्रमांक १ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. मिनल निलेश गावंडे यांनी १ हजार ५०१ मते घेत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) चे डॉ. प्रकाश शिंगणे यांनी १ हजार २०८ मते तर २ ब मधून शिवसेनेच्या वैशाली कपिल खेडेकर यांनी ७५५ मते मिळवत यश संपादन केले आहे.

प्रभाग क्रमांक ३ अ मधून काँग्रेसच्या सुनिता प्रकाश शिंगणे यांनी ९८७ मते तर ३ ब मधून भाजपचे शेख रफीक कादर यांनी ९५० मते मिळवून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून भाजपचे दिपक विश्वनाथ खरात यांनी १ हजार १३९ मते तर ४ ब मधून काँग्रेसच्या वहिदा बेगम मोहम्मद जकाउल्ला यांनी ९०० मते मिळवत सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ५ अ मधून काँग्रेसच्या सीमा गोपाल देव्हडे यांनी १ हजार ९०४ मते तर ५ ब मधून काँग्रेसचे मोहम्मद इसरार अब्दुल जब्बार यांनी १ हजार ८३४ मते मिळवत विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ६ अ मधून भाजपचे अमोल सुरेश खबुतरे यांनी १ हजार ५०० मते तर ६ ब मधून काँग्रेसच्या शितल संतोष देशमुख यांनी १ हजार ४१७ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ७ अ मधून काँग्रेसच्या संध्या आनंद बोंद्रे यांनी १ हजार ७६२ मते तर ७ ब मधून काँग्रेसचे खान उबेद अली शब्बीर अली यांनी १ हजार ६४५ मते मिळवून विजय संपादन केला आहे.

प्रभाग क्रमांक ८ अ मधून भाजपच्या प्रिया राम बनसोडे यांनी १ हजार ३२८ मते तर ८ ब मधून भाजपचे सुहास रामकृष्ण शेटे यांनी १ हजार ४३ मते मिळवत यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून भाजपच्या ज्योतीताई भगवानराव वाळेकर यांनी १ हजार ४९८ मते तर ९ ब मधून भाजपचे गुरुदत्त विनायक सुसर यांनी १ हजार ३६७ मते मिळवून विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक १० अ मधून काँग्रेसचे रत्नदिप यशवंत शिनगारे यांनी १ हजार २४० मते तर १० ब मधून काँग्रेसच्या स्वाती अमोल लहाने यांनी १ हजार १३१ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ मधून काँग्रेसच्या सरस्वती पुरुषोत्तम वायाळ यांनी १ हजार १६८ मते तर ११ ब मधून भाजपचे दिपक बुलचंद वाधवाणी यांनी १ हजार २२० मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १२ अ मधून काँग्रेसच्या सुप्रिया प्रशांतकुमार भटकर यांनी १ हजार ५५६ मते तर १२ ब मधून काँग्रेसचे मो. आसीफ मो. शरीफ यांनी १ हजार ७०४ मते मिळवून यश संपादन केले आहे.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

आज १७ ते २० मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

वाचनानंदाची दिवाळी; शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..