vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !

गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त !

 

 

मुंबई प्रतिनिधी-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षैत्र चौंडी व गोदा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या यात्रेतून जलव्यवस्थापन व जलसंवर्धनाचा संदेश दिला गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या वतीने जलयात्रेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे व जळगाव जिल्ह्यातून ही यात्रा श्रीक्षेत्र महेश्वर येथे आल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा.डॉ मोहन यादव जी यांच्या उपस्थितीत यात्रेचा शानदार समारोप झाला.

जलयात्रा सांस्कृतिक अध्यात्मिक आणि दोन राज्याच्या पारंपारीक वारसा अधिक दृढ करण्याचा संकल्प होता. महेश्वर येथील ऐतिहासिक नर्मदा तिरावर जलपूजन करण्यात आले. गोदावरी व नर्मदा नदीच्या संगमाचा जलकलश जलसंपदामंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त केला.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

vishwatmaklokswamivarta

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

जालना : शासकीय परिचारिका महाविद्यालयात पॉश कायदा व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta