vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

राज्य प्रतिनिधी-

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴भारत हे संविधानावर आधारित सार्वभौम लोकशाही राष्ट्र आहे.

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याचे “शरीयत आमच्यासाठी संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे” हे विधान अत्यंत गंभीर, धोकादायक व स्पष्टपणे संविधानविरोधी आहे. अशा प्रकारची विधाने केवळ कायद्याच्या राज्यालाच नव्हे तर देशाच्या एकात्मता, सामाजिक सलोखा व लोकशाही मूल्यांनाही गंभीर धोका निर्माण करणारी आहेत. ही मानसिकता भारताच्या संविधानिक व्यवस्थेला नाकारणारी व समांतर धार्मिक प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दर्शवते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा इस्लामिक मानसिकते बद्दल लिहिले आहे की,
“इस्लामच्या सिद्धांतांपैकी एक सिद्धांत असा आहे की, ज्या देशात इस्लामिक राजवट नाही अशा देशात जर इस्लामिक कायदा आणि त्या देशाचा कायदा यांच्यात विरोध आला तर त्या देशाच्या कायद्यापेक्षा इस्लामिक कायदा वरचढ ठरेल. त्यावेळी मुस्लिमांसाठी इस्लामिक कायद्याचे पालन करणे आणि त्या देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणे इस्लामनुसार न्याय्य ठरेल.”
( संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड ८ – पान क्र. २९२)

भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य देते; परंतु हे स्वातंत्र्य संविधानाच्या अधीन आहे, संविधानाच्या वर नाही. कोणत्याही व्यक्तीस किंवा समूहास आपल्या धार्मिक श्रद्धांच्या आधारे संविधानाच्या सर्वोच्चतेला, कायद्याला नाकारण्याचा अधिकार नाही.

अशा प्रकारचे संविधानविरोधी, समाजात तेढ निर्माण करणारे आणि देशविघातक वक्तव्य करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा अशा वक्तव्यांना मूक संमती मिळाल्याचा धोकादायक संदेश जाईल.
या घृणास्पद व संविधानविरोधी वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

🇮🇳जय हिंद💪जय भारत🙏
#constitution #2026 #india

एडवोकेट रोहन  मालवडकर जमादार साभार

 

संबंधित पोस्ट

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय,अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! ‘स्वयंघोषित विचारवंतांचे उदात्तीकरण का?’ – विशेष परिसंवाद !पुरोगाम्यांच्या हत्यांचे भांडवल करून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री