vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – मंत्री आदिती तटकरे

माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी: माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मंत्री तटकरे म्हणाल्या की, माणगाव नगरपंचायतीमधील 45, तळामधील 69 आणि म्हसळा मधील 40 (जि. रायगड) नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलापासून वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या एकूण 154 घरकुलांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. या घरकुलासंदर्भातील निधी तसेच पात्र लाभार्थ्यांच्या मान्यतेसाठी करावयाची कार्यवाही कालमर्यादेत करावी.

प्रत्येक लाभार्थ्यास रुपये २.५० लाख प्रमाणे घरकुल अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांचा विचार करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्रदान करण्यात यावा. या योजनेमुळे शहरी भागातील आदिवासी कुटुंबांना सुरक्षित निवाऱ्याचा लाभ मिळणार आहे.

बैठकीस आदिवासी विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके, अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम, तळा तहसिलदार स्वाती पाटील, माणगाव उपनगराध्यक्षा रिया उभारे, आनंद यादव, लक्ष्मी जाधव, दिलीप जाधव, ॲड. उत्तम जाधव, नाना भुवड, जगदीश शिंदे, नागेश लोखंडे, किशोर शिंदे, परशुराम कदम, अलिम पल्लवकर, लक्ष्मण हिलम, विजय तांबे, शाहीद उके आदी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण.. हा सण म्हणजे मांगल्याचा..चैतन्याचा दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कृषीआधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर. आणि अमरावती विभागातील बातम्या…