vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कल्याण  आर्चीस अपार्टमेंट  मधील घराचे स्लॅब प्लास्टर व हॉल मधील सिलिंग कोसळले दोन गंभीर जखमी.

कल्याण  आर्चीस अपार्टमेंट  मधील घराचे स्लॅब प्लास्टर व हॉल मधील सिलिंग कोसळले दोन गंभीर जखमी.

कल्याण : प्रतिनिधी आर्चीस अपार्टमेंट  मधील घराचे स्लॅब प्लास्टर व हॉल मधील सिलिंग कोसळले. तर हॉल मध्ये बसलेल्या घर मालक जावडेकर व त्याच्या मुलाच्या अंगावर सिलिंगची पीओपी शीट कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी  घटनास्थळी त्वरित धाव घेत घरातील सामान शिफ्ट  करून तूर्तास दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले .

कल्याण पश्चिमे कडील स्टेशन नजीक असलेल्या आर्चीस अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे जावडेकर यांच्या राहत्या घरातील बेडरूम, हॉल मधील स्लॅब जीर्ण झाले असून स्लॅब मधील लोखंडी सळ्याना गंज लागल्याने सळया जीर्ण झाल्या असून स्लॅबचे प्लॅस्टर निघाल्याने केवळ लोखंडी सांगाडा उरलेला असल्याने स्लॅब धोकादायक बनलेला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमाराला जावडेकर यांच्या घरातील हॉल च्या सिलिंगचा स्लॅब अचानक पणे कोसळायला तसेच हॉल मधील सलिंगला लावलेली पीओपीची शीट हॉल मध्ये बसलेलले मकरंद जावडेकर व त्याच्या मुलाच्या अंगावर कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटने प्रकरणी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी घाव घेतली. जावडेकर यांच्या घरातील किचन , हॉल व बेडरूम च्या सिलिंगची पाहणी केली असता त्यांना सर्वच सिलिंग धोकादायक असल्याचे दिसून आले सिलिंगचे प्लॅस्टर ही निघाले असून लोखंडीसळ्या गंजलेल्या व प्लॅस्टर फुगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य स्लॅब कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने घरात राहणे धोकादायक असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी जावडेकर यांच्या कुटुंबियांना घरातील समान अन्याय ठिकाणी शिफ्ट होण्यास सांगितल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली .

संबंधित पोस्ट

लोणावळा येथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधकांचे तोंड बंद होईल –केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले,नवीन मंत्रिमंडळाचे रिपब्लिकन पक्षातर्फे स्वागत  

नवी मुंबईत अपहरण करणारी टोळी समजून रिक्षावाल्यासह दोन महिलांना जमावाची मारहाण, गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

vishwatmaklokswamivarta

निम्न पैनगंगा प्रकल्प परिसरातीलगावकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta