vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार, 4 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत एक सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यातील 27 उपकेंद्रावर ही परीक्षा आयोजित केलेली असून परीक्षा कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही व्यक्तीस अथवा वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत.

 

****

संबंधित पोस्ट

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

vishwatmaklokswamivarta

सातारा येथे उभारण्यात येणारे ‘माजी सैनिक एकात्मिक संकुल’ हे राज्यात आदर्श ठरावे – पालकमंत्री शंभुराज देसाई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा