vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

      अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. लोकसहभागातून हे रस्ते होणार असून याकामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

    शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. यासाठी लोकसहभागातून पांदण रस्ते बांधण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून 5 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. ही योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. यातील 7.5 लाख रुपयांचा निधी शासन देणार असून उर्वरित 1.5 लाख रुपये लोकसहभागातून द्यावे लागणार आहेत.

    या योजनेचा पथदर्शी प्रकल्प अंजनगाव सुजी तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या तालुक्यात 20 किलोमीटर, तर इतर सहा तालुक्यात प्रत्येकी पाच किलोमीटरप्रमाणे 30 किलोमीटरचे पांदण रस्ते बांधण्यात येणार आहे. या कामासाठी लोकजागर या संस्थेची निवड करण्यात आली आहे. योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होणार आहे.      शेतरस्ते मोकळे करणे आणि जल पुनर्भरणासाठी हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार आहे. पाणंद रस्त्यांसाठी पाच किलोमीटरच्या आतील नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे. हे साहित्य स्वयंसेवी संस्थांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

000000

संबंधित पोस्ट

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन