vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” उपक्रम प्रशंसनीय – निवडणूक निरीक्षक जीवनेस्वीप समितीच्या ‘डीपी, स्टेटस व रिंगटोन’ उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

“डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” उपक्रम प्रशंसनीय – निवडणूक निरीक्षक जीवनेस्वीप समितीच्या ‘डीपी, स्टेटस व रिंगटोन’ उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी- मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी मोबाईलवर डीपी, स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या “डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे विमोचन मनपा निवडणूक आढावा बैठकीत मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, वर्षा पवार, हेमा बडे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल आदी उपस्थित होते.

​सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीपी ठेवणे, स्टेटस बदलणे व विविध रिंगटोन लावणे या सामान्य माणसाच्या आवडत्या सवयी आहेत. या गोष्टीचे औचित्य साधून “डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्हॉट्सॲप स्टिकर तसेच रिंगटोन व कॉलर ट्यून लावण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे “हम भारत के मतदाता है” व मुख्य निवडणूक अधिकारी- महाराष्ट्र यांचे “ये पुढे, मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर” ही दोन गीते तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रसारित विविध ऑडिओ क्लिप्स व जिंगल्स; क्यूआर कोड, लिंक व ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात अहिल्यानगरकरांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर डीपी व स्टेटस ठेवण्यासाठी स्वीप समितीने १:१ (1:1) या प्रमाणात उपलब्ध करून दिलेला लोगो तसेच “मी भारत आहे, मी महाराष्ट्र आहे, मी अहिल्यानगर आहे व मी मला मतदान करणार” अशा आशयाचे डिझाइन्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यांना डीपी, स्टेटस व गाणे हवे आहे त्यांनी देशातल्या पहिल्या अहिल्यानगर मनपा ‘स्वीप केअर’ असलेल्या ८०५५८०९३९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव पाठवावे.

“अहिल्यानगर मनपा स्वीप समितीचे उपक्रम देशात व राज्यात गौरविले जात आहेत. अशा उपक्रमांच्या माध्यमातून निश्चितच मतदानाचे महत्त्व कळून मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. डीपी-स्टेटस यासारख्या घटकांमध्ये आपणास रस असतो. आपण इतरांचेही डीपी स्टेटस पाहतो. या बाबींचा या उपक्रमात निश्चितच फायदा होणार आहे. प्रशासनाची दोन्ही गाणी अत्यंत प्रेरणादायी आहेत. यासारखे उपक्रम प्रशंसनीय व अनुकरणीय आहेत,” असे आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

00000

संबंधित पोस्ट

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

डीजे मुक्त आंबेडकर जयंती साजरी करा आणि विवाह सोहळा अर्ध्या तासात संपवा तिसऱ्या धम्म संगीती मध्ये विविध ठराव मंजूर 

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश*  

कर्नाटकमध्ये  पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी 

vishwatmaklokswamivarta