vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांची सामुहिक जबाबदारी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांची सामुहिक जबाबदारी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- परीक्षेत कॉपी करणे ही अनैतिक बाब आहे. विद्यार्थी दशेत कॉपीमुक्त अभियान राबविणे हे केवळ परीक्षा पद्धती सुधारणा नसून भविष्यातील नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे ही सर्व संबंधित विभागांची सामुहिक जबाबदारी आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

संत एकनाथ रंगमंदिरात आज माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या अनुषंगाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात मुख्याध्यापक, शिक्षकांची सभा पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव श्रीमती प्रियाराणी पाटील,सहसचिव दीपक कोकतरे, जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.)आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा मेहेत्रे, दीपाली थावरे, गीता तांदळे तसेच गटशिक्षणाधिकारी, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, परीक्षा म्हणजे प्राप्त ज्ञानाची उजळणी असते. त्यासाठी कॉपी सारख्या गैरमार्गाचा वापर ही अनुचित व अनैतिक बाब आहे. विद्यार्थ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी आपण त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुसंस्कारीत विद्यार्थी घडविणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी दशसुत्रीसारखे उपक्रम शिक्षकांनी राबवावे. जेणेकरुन कॉपीसारख्या अपप्रवृत्तींना विद्यार्थी बळी पडणार नाहीत. कायद्याचा, सुरक्षा यंत्रणेचा वापर करुन कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करता येईल. पण मुळातच संस्कारांनी अशा अपप्रवृत्ती विद्यार्थ्यापासून दुर ठेवण्यावर भर द्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती लाठकर यांनी आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

संविधानाने दिलेले समान हक्क तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध -जिल्हाधिकारी संतोष पाटील*