vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बुलढाण्यात गुरुवारी(दि.22) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

बुलढाण्यात गुरुवारी(दि.22) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि. 22 जानेवारी 2026 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड, बुलढाणा येथे करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये सहयोग को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व दास गॅस इक्विपमेंट या नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

दहावी, बारावी आयटीआय, पदविका(डिप्लोमा) तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्र व बायोडाटासह प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहेत. तरी बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याबद्दल वरिष्ठ क्षयरोग उपचार परिवेक्षक रवींद्र पाईकराव यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गतमहिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा

महिला सक्षमीकरणावर राज्य सरकारचा भर–महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,माणगाव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ संपन्न

अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित, शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चार सदस्यीय चौकशी समिती !