vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

 

 सांगली प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील खंडाळा – पळशी – कराड – कुंडल – सांगली -अंकली रामा क्रं 142 किमी 173/500 ते 174/500 (भाग शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी) हा रस्ता सुधारणा काम पूर्ण करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी 2026 ते दिनांक 30 जुलै 2026 या कालावधी दरम्यान वाहतुकीस बंद करून पुढील अटी व शर्तीचे अधीन वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी निर्गमित केले आहेत. मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहेत.

पर्यायी वाहतूक मार्ग, इस्लामपूरकडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी – शिवशंभो चौक – जुना बुधगाव रोड – पट्टणशेट्टी होंडा शोरुम – टी. व्ही. एस. शोरुम – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल.

 पलूस-कुंडल कडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी – शिवशंभो चौक – जुना बुधगाव रोड – पट्टणशेट्टी होंडा शोरुम – टी.व्ही.एस. शोरूम – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल

 अटी व शर्ती – नमूद ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला “काम चालु असल्याने रस्ता वाहतुकीस बंद” असा मोठ्या आकारातील माहितीदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसरात ज्या ज्या ठिकाणाहून वाहतुक वळविली जाणार आहे त्या सर्व ठिकाणी माहितीदर्शक फलक दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नमुद सर्व ठिकाणी मोठ्या आकाराचे रेडीयमयुक्त दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स लावणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित ठेकेदार यांनी 24 तासांकरिता त्यांच्याकडील सुरक्षा रक्षक नेमणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यावर विद्युत पुरवठा चालू राहिल याची ठेकेदार यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. नमुद ठिकाणी काम चालू असताना अपघात झाल्यास किंवा अन्य प्रकारे अनुचित प्रकार घडल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदार हे त्याकरिता सर्वस्वी जबाबदार राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानशासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण

भायगव्हाण येथे ‘राज्य रेशीम दिना’निमित्त शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर रेशीम शेती शाश्वत उत्पन्नाचा प्रभावी पर्याय – शास्त्रज्ञ अंकुश गाडगे

vishwatmaklokswamivarta

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश…

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta