vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

 650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी-राष्ट्रीय चर्मकार संघ आयोजित 650 व्या जयंती महोत्सव निमित्त राष्ट्रीय संत रोहिदास महाराज संत कक्कया महाराज छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे माध्यमिक शाळातील इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी संत व महामानव यांच्या विचारावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत निबंध लिहून विद्यार्थ्यांनी शाळा मुख्याध्यापक मार्फत निबंध संस्थेकडे जमा होतील याची सुरुवात दिनांक 31 जानेवारी 2026 पासून झाले असून विभागातील शाळा शाळातून संघामार्फत पत्रक पोचविण्यात येत आहेत

: धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल सायन मधील डी एस हायस्कूल साधना विद्यालय आणि युनिव्हर्सल रात्र शाळा धारावी यांना निवेदन पत्र दिले असून माटुंगा कुर्ला माहीम धारावी या भागातील शाळेला सहभागी करून घेणार आहोत

 सदर कार्यक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष श्री बाबुराव माने माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेश अध्यक्ष रामभाऊ कदम मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर सचिव गणेश खिल्लारे माजी मुख्याध्यापक श्री पोटे सर आणि धारावी तालुका अध्यक्ष श्री दिलीप गाडेकर यांच्या अधिपत्याखाली होत आहे या कामी संपर्कप्रमुख शंकर खिल्लारे समन्वयक शंकर बळी ही मंडळी कार्यरत आहे निबंध स्पर्धेचे शाळा मुख्यांना निवेदन सादर करतेवेळी श्री गिरीराज शेरखाने संदीप सोनवणे चंद्रकांत जाधव श्रीमती अलका साबळे व सविता शेरखाने आणि तालुका प्रमुख अध्यक्ष श्री दिलीप गाडेकर सर्वांनी मिळून निवेदन शाळांना दिली आहे अशी माहिती संघाकडून देण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

मनोज जरांगे पाटील यांना-मुंबई सीएसटीतील  आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश; आंदोलनाला नवा ट्विस्ट

vishwatmaklokswamivarta

पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेच्या उपस्थित सतीश घाटगे यांचा भाजपात जाहीर प्रवेश-कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण..

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जोरदार तयारी सुरू..

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश