vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत असून, या पार्श्वभूमीवर जनसामान्यांनी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक यांनी केले आहे.

एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात 29 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वतःला सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागेवर भासवणारे मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास यांच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सह जिल्हा निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, करारनामे, विकसन करारनामे आदी सामान्य नागरिकांची कामे नियमित स्वरूपात मोठ्या प्रमाणात केली जातात. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीद्वारे मूळ मालकांची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणतेही व्यवहार करतांना जागरुकता बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनिबंधक रमेश पगार यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

ईद अल अधा निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभेच्छा

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण