vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

रायगड- प्रतिनिधी :- निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी, संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर जावळे यांनी 6 फेब्रुवारी (मतदानाच्या आधीचा दिवस), 7 फेब्रुवारी (मतदानाचा दिवस) आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी रायगड जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रातील तसेच ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणच्या कार्यक्षेत्रातील सर्व ठोक तसेच किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 6 व 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत सदर विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

रायगड जिल्हा परिषद 59 व 118 पंचायत समिती गणांच्या निवडणूकीकरीता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

   निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर जावळे यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त आदेशान्वये, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1915 जिल्ह्यात च्या कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार रायगड जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निर्वाचन क्षेत्रातील तसेच ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणच्या कार्यक्षेत्रातील सर्व ठोक तसेच किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-1, एफएल-2, एफएल-३. एफएल- 4 ( क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3, सीएल / एफएल/टिओडी-3, टिडी-1 इ.) 6 फेब्रुवारी 2026 रोजी (मतदानाच्या आधीचा दिवस), 7 फेब्रुवारी 2026 रोजी (मतदानाचा दिवस) या दिवशी संपूर्ण दिवस व 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत रायगड जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित जिल्हा परिषद/पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रातील सर्व ठोक तसेच किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. किशोर जावळे यांनी दिले आहेत.

     या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष

vishwatmaklokswamivarta

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

भारत सरकार पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (#एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

संकल्पशील आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या संकल्पनेतून तळणी येथे पार पडली महिलांना बचत गटातून स्वावलंबी बनवण्याची मार्गदर्शनपर बैठक…