vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करावी- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करावी- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

ठाणे, प्रतिनिधी :- हवामान बदल, बाजारातील चढ उतार आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी असणाऱ्या मर्यादांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती मिळावी, यासाठी कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ ॲप विकसित केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे. ॲपची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai आहे.                                                                             शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळीच व विश्वासार्ह कृषी माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने राज्यभर ‘महाविस्तार एआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप सुरू केले आहे. महाविस्तार एआय ॲप हे शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करणारे एक प्रभावी डिजिटल व्यासपीठ आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचा सल्ला तसेच आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन एका क्लिकवर उपलब्ध करून देते. एआय चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात. या ॲपबाबत कृषी विभागाने जिल्हाभर जनजागृती केली आहे.
     या ॲपच्या माध्यमातून हवामान अंदाज, पीक लागवडीच्या पद्धती, कीड व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था तसेच डीबीटीवरील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. बाजारभावाची अद्ययावत माहिती, विविध कृषी योजना, अनुदान व पीकविमा योजनांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0000000000

संबंधित पोस्ट

राज्यात अनधिकृत कत्तलखान्यातील गोहत्या बंदीसाठी विशेष मोहीम- गृहराज्यमंत्री योगेश कदम..

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झिरो टॉलरन्स महत्वाचे

vishwatmaklokswamivarta

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

vishwatmaklokswamivarta