vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

अमरावती, प्रतिनिधी: जागतिक कर्करोग दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे तसेच लवकर निदान व योग्य उपचारांचे महत्त्व रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कैंसर सर्जन डॉ. अतुल यादगिरे, डॉ. रोहित मुंदडा , डॉ. माधुरी गाडेकर तसेच ऑन्को गायनॅकोलॉजिस्ट डॉ. भावना सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कर्करोगाचे प्रकार, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. अतुल यादगिरे यांनी कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे नमूद केले. डॉ. रोहित मुंदडा यांनी बदलती जीवनशैली, तंबाखूचे सेवन व चुकीच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे सांगितले. डॉ. माधुरी गाडेकर यांनी रक्तामधील कर्करोगांविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. भावना सोनटक्के यांनी महिलांनी नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ आदित्य भागवत यांनी कीमोथेरेपी बद्दल मार्गदर्शन केले.

सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग शस्त्रक्रिया मोफत होतात याबद्दल देखील माहिती देण्यात आली .

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला उपस्थित डॉ आयुष हेडा , डॉ रणजित मांढवे, डॉ भूषण मुंदडा, डॉ अमित बागडिया, डॉ तृप्ती जवादे, डॉ सत्यम सत्यार्थ, डॉ मनीष नाथणकर, डॉ तेजश्री कीनखेडे, डॉ अलकेश गुल्हाने, डॉ किरण परिसे, डॉ ऐश्वर्या , डॉ अभिनव, डॉ स्नेहल चव्हाण, डॉ सपना गुप्ता, नर्सिंग स्टाफ मंगल मगरदे, ज्योती काळे, कविता बेरड, शालू केवाळे, नंदा टेटु, एनसीडी विभागातील दिनेश हिवराळे यांनी मार्गदर्शन केले.

00000

संबंधित पोस्ट

आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन* २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

शहरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनची व्यापक पावले; नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय  व्यवसायिकांचा सल्ला घ्या- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 28 जून 2026 रोजी..

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta