vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

 

 सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितीच्या 122 निर्वाचन गणांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सरासरी 69.76 टक्के इतके मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

 मतमोजणीसाठी तालुकानिहाय टेबल संख्या व फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. आटपाडी – 18 टेबल, 12 फेऱ्या, जत – 27 टेबल, 13 फेऱ्या, खानापूर – 16 टेबल, 9 फेऱ्या, कडेगाव – 16 टेबल, 11 फेऱ्या, तासगाव – 20 टेबल, 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ – 16 टेबल, 9 फेऱ्या, पलूस – 14 टेबल, 9 फेऱ्या, वाळवा – 22 टेबल, 19 फेऱ्या, शिराळा – 20 टेबल, 9 फेऱ्या, मिरज – 22 टेबल, 19 फेऱ्या.

 तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – आटपाडी – पहिला मजला हॉल नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव, दत्तमाळ. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, दिवाणी न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.

संबंधित पोस्ट

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या फसवणूकीने गिरणी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात, ५ मार्चला भव्य संताप मोर्चा

ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली अर्पण; सदस्यांनी आठवणींना दिला उजाळा

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

विभागाने द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी-मंत्री पंकजा मुंडे *गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta