vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथे 13 फेब्रुवारी,2026 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथे 13 फेब्रुवारी,2026 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्दमाने दि. 13 फेब्रुवारी,2026 रोजी सकाळी 10-00 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जुने कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात एस.एस.सी., एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इ. या शैक्षणिक पात्रतेच्या नोकरीच्या संधी व मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेकरिता तसेच स्वयंरोजगाराकरिता शासकीय महामंडळाच्या कर्ज योजनाबाबत उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

खासगी आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीचीनोंद करण्यासाठी ‘शी बॉक्स पोर्टल’..

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स 00000

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकामुळे शेअर बाजारात आज काळा दिवस! हजारो कोटींचा मिनिटांत स्वाहा..

उ‌द्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू