vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

 

अमरावती, प्रतिनिधी) : राज्य नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथून जिल्हाधिकारी आशिष येरेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तीनशे कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला

        आमदार सुलभा खोडके यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, उपवनसंरक्षक अजुर्ना के. आर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.     जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांची माहिती, त्यांची चालू कामे, सद्यस्थिती तसेच भविष्यकालीन नियोजनाबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादरीकरणाव्दारे सविस्तर दिली. अमरावती जिल्ह्यात 14 तालुके आहेत. यामुळे विकास कामांसाठी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विकास कामांसाठी जिल्ह्याला अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. सन 2025 -26 जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यानुसार 527 कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. सन 2026 -27 साठी 434. 71 कोटी रुपयांचे स्पिलिंग दिले आहेत. त्यानुसार आराखड्याचे काम करण्यात आले आहे. परंतु यामध्ये अतिरिक्त 300 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे श्री. येरेकर यांनी यावेळी मागणी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी तालुका हा घटक महत्त्वपूर्ण आहे.जिल्ह्यातील लोकसंख्या, तालुक्यांची संख्या, भौगोलिक क्षेत्रफळ याचा विचार करून अतिरिक्त निधीच्या आवश्यकतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक उत्तम काम करणाऱ्यास निधीची कमतरता पडणार नसल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये वाढीव निधी प्राप्त होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना आता नवी उभारी मिळणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे आमदार श्रीमती खोडके यांनी सन 2026 -27 साठी मनपा अंतर्गत विविध विकास कामांसाठी 100 कोटी रुपये अतिरिक्त निधीची विशेष मागणी केली. जिल्ह्यामध्ये मनपाच्या 63 शाळा आहेत. मनपा शाळेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी जिल्हा नियोजन समिती आराखड्यात नवीन लेखाशीर्ष समाविष्ट करण्याबाबतची मागणीही त्यांनी यावेळी केली.

संबंधित पोस्ट

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी– मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानमंडळाच्या डिजिटल डॅशबोर्डचे उद्घाटन• विधान परिषद सभापती, प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष, ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित• प्रलंबित संसदीय आयुधांच्या रिअल-टाईम पाठपुराव्याला गती• विधानमंडळाच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वाचा टप्पा

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta