vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

बुलढाणा, प्रतिनिधी: खामगाव शहरात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने त्या दिवशी भरविण्यात येणारा गुरुवारचा आठवडी बाजार रद्द करून पुढील दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी संदर्भीय पत्राद्वारे कळविले होते की, जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. त्याच दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

या पार्श्वभूमीवर बाजार आणि यात्रा कायदा, १८६२ च्या कलम ५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारीचा आठवडी बाजार रद्द करून तो पुढील दिवशी भरविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदानभविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – नितीन गडकरी..

vishwatmaklokswamivarta

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा…