vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

        अमरावती, प्रतिनिधी: जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत जिल्ह्यातील चार उमेदवारांनी यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे कौशल्य विकास क्षेत्रात जिल्ह्याने गरुडझेप घेतली असून, ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते या यशस्वी उमेदवारांचा त्यांच्या पालकांसह गुणगौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

  समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कौशल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज अनेक नवीन संधी विद्यार्थ्यांना खुणावीत आहेत. तरुणांनी विविध क्षेत्रात आपली कौशल्ये विकसित करावीत, असे श्री. येरेकर म्हणाले. या विजेत्यांना पुढील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

     या स्पर्धेत अमरावतीला दोन प्रथम आणि दोन द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत. यामध्ये फार्मसीची विद्यार्थिनी असलेल्या कु. सारथा (निशा) बंड हिने केवळ कुकिंग या छंदाच्या जोरावर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच आदर्श लिहारे याने सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्या-मुंबईच्या स्पर्धकांसमोर सुरुवातीला मनात शंका होती, मात्र निकालानंतर आपणही कोणापेक्षा कमी नाही हा विश्वास मिळाल्याचे आदर्शने आपल्या मनोगतात सांगितले.

   शशांक लोखंडे यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि विराज पुसदकर यांनी केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट या विषयात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याची शान वाढविली आहे.

    ‘कौशल्यांचे ऑलिम्पिक’ मानली जाणारी ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. 2026 ची जागतिक स्पर्धा शांघाई (चीन) येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून राज्यभरात 63 क्षेत्रांत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये अमरावतीच्या 15 उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले होते. आता या चारही विजेत्यांची निवड पुढील प्रादेशिक फेरीसाठी झाली असून, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने घेतलेल्या विशेष मेहनतीबद्दल विजेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

0000000

संबंधित पोस्ट

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्यालाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ.