vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

– विविध योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधीक लाभ वितरण- 40 स्टॉलच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती..

सांगली, प्रतिनिधी : प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येक नागरिकास समान संधी मिळून न्याय लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा सांगलीच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज व्यक्त केला,

  जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा कणा आहे. सर्व वकील बांधव हे या न्याय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि निष्ठेने न्यायव्यवस्थेला बळकटी दिलेली आहे. न्याय, निष्ठा आणि संविधान यांच्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो. त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करूया, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत व देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत विधी महाविद्यालय विटाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विटा च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शेवटी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

महसूल विभाग शासनाचा कणा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- महसूल सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ- नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी कार्यालय, क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे २२०/३३ केव्ही उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन-पनवेल महामार्गावरीलठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न..

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर