vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना,  (प्रतिनिधी) – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आज (ता.२२) सकाळी 11 वाजता “मन की बात” या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा भाजपा जालना महानगर जिल्ह्यात प्रत्येक बूथ वर संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे हे त्यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये बूथ वर आयोजित कार्यक्रमास उपस्थित होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असून, ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशहिताचे विचार, सामाजिक जाणीवा आणि नवचेतना निर्माण होते. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मंत्रावर चालत केंद्र सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने पार पाडली पाहिजे. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.

तसेच सदरील कार्यक्रम भाजपा जालना महानगरातील विविध मंडळात आयोजित करण्यात आला त्यामध्ये नवीन जालना मंडळात मंडळ अध्यक्ष सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जुना जालना मंडळात मंडळ अध्यक्ष महेश निकम, पूर्व जालना मंडळात अमोल धानुरे व जालना ग्रामीण मंडळात तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रत्येक नगरसेवकांनी हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी आघाडी, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, इत्यादी आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी “मन की बात” कार्यक्रम ऐकला.

संबंधित पोस्ट

नागरी सुविधापूर्तीप्रमाणेच नागरिक सुरक्षेलाही महत्व देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन 

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेराज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

वसतिगृह प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय; ३० वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर मिळणार सहकार्य आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा; शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये – पालकमंत्री डॉ. अशोक उईके