vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकत प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकत प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी : मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव अजित देशमुख, हवेली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने, मंडळ अधिकारी मिलिंद सेठी, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील आंबेकर उपस्थित होते.

मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील स.न. ४४, एकूण क्षेत्र ५ हेक्टर ९१ आर जमिनीच्या मिळकतीबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून, तक्रारकर्त्यांनी मांडलेल्या सर्व आक्षेपांसंदर्भात सविस्तर तपास अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले. हवेली तालुक्यातील जमीन बेकायदेशीर ताब्यात घेतल्यासंदर्भात सात दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपाध्यक्ष बनसोडे अधिकाऱ्यांना दिले.

००००

संबंधित पोस्ट

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी२० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत…

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

जालन्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा; सरकारला जनतेच्या रोषाचा इशारा..