vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे खरीप २०२५ हंगामातील पीक विमा निश्चितीसंदर्भात मंत्रालयात बैठक

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेखरीप २०२५ हंगामातील पीक विमा निश्चितीसंदर्भात मंत्रालयात बैठक..

मुंबई, प्रतिनिधी: हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला.

या बैठकीत राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी आणि भात व सोयाबीनचे तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदविण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

कृषी मंत्री भरणे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, उपलब्ध आकडेवारीवर तत्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती कोणताही विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीत कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी, उपसचिव प्रतिभा पाटील व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम – सभापती प्रा.राम शिंदे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य सर्व राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने 

भारत रंग महोत्सवात तीन मराठी नाटके

vishwatmaklokswamivarta

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta