vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महिला वाहन चालक प्रशिक्षक प्रशिक्षण

महिला वाहन चालक प्रशिक्षक प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी महिलांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी महिलांना टॅक्सी, बस चालक प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे यांच्यातर्फे ब्रिजस्टोन इंडीया संस्थेच्या सहकार्याने १० महिलांसाठी ३० दिवसांचे अनिवासी विशेष वाहन प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि.२८ रोजी सुरु होणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांचा अभ्यासक्रम थेअरी व प्रॅक्टीकल असे प्रशिक्षणाचे स्वरुप आहे.प्रशिक्षणाचा पत्ता हॉटेल कलासागर, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्यापुढे, पुणे मुंबई महामार्ग, कासारवाडी, पुणे ४११०३४.

जिल्ह्यातील इच्छुक महिलांनी संपर्क करावा,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे.

आवश्यक पात्रताः- किमान २ वर्षे जुने लहान व मोठी चारचाकी वाहने चालविण्याचा परवाना, किमान १० वी पास किंवा आयटीआय, इंजिनिअरिंग पदविका, मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी असल्यास प्राधान्य

०००००

संबंधित पोस्ट

उद्योजकांनी मिलाप प्रणालीचा लाभ घ्यावा – प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन