vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :-राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहे. प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 असून जास्तीत पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

       राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, समाज माध्यम पुरस्कार. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2025 या कॅलेंडर वर्षाकरीता दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 15 मार्च, 2026 अशी राहील.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने यासोबत पाठविण्यात येत आहेत. तसेच सदर माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in, आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in, या ब्लागवर उपलब्ध आहे.

0000000

संबंधित पोस्ट

अखेर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर* *तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर झालं मतदान!*विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. ● तर, विरोधात २३२ मते पडली.

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता.

माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी   येत्या 7 जूनला बकरी ईद सण आहे. बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. या अनुषंगाने प्रतिबंधित बाबींची माहिती देणारा लेख…

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर