vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

नांदेड, प्रतिनिधी :- दिनांक 10 फेब्रुवारीपासून नांदेड जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर इयत्ता 12 वीची परीक्षा सुरू असून ती भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

उद्या 27 फेब्रुवारी रोजी इयत्ता 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर असून पुढील सर्व परीक्षांसाठीही जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय राहणार आहे. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी कॉपीमुक्त वातावरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

शासन निर्णय दि. 24 नोव्हेंबर 2025 नुसार जिल्हा दक्षता समितीची बैठक 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, डायटचे प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना) उपस्थित होते. परीक्षा केंद्रांवर कोणताही बाह्य हस्तक्षेप होऊ नये, नातेवाईक वा इतर व्यक्तींनी केंद्र परिसरात गर्दी करू नये तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण वातावरण मिळावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवत कोणत्याही केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ दिलेला नाही.

प्रशासनाच्या विशेष उपाययोजना :संवेदनशील केंद्रांवरील केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल. 58 केंद्रांवर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती; उत्तरपत्रिका डिस्पॅच होईपर्यंत उपस्थिती. महत्त्वाच्या विषयांसाठी 58 जिल्हास्तरीय व सुमारे 80 तालुकास्तरीय भरारी पथके कार्यरत. सर्व 112 केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट प्रक्षेपण; मॉनिटरिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत स्वतंत्र कक्ष स्थापन. वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्हीद्वारे देखरेख. अतिसंवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे व्हिडिओ चित्रीकरण. कर्तव्यात कसूर करणाऱ्या 12 केंद्रसंचालक/पर्यवेक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई; उमरी येथील बैठे पथकातील सदस्यांवरही कारवाई.

गैरप्रकारांवर कठोर कारवाई,इंग्रजी विषयात 1, भौतिकशास्त्रात 7, रसायनशास्त्रात 3, गणित व संख्याशास्त्रात 5, जीवशास्त्रात 2 आणि हिंदीत 1 असे एकूण 19 कॉपी प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.किनवट तालुक्यातील सौ. संगितादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा येथे बाहेरील अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवशास्त्र परीक्षेच्या दिवशी गुन्हा नोंदविण्यात आला असून परीक्षेच्या कामात कुचराई करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.बारावीच्या 42 हजार 803 विद्यार्थ्यांसाठी 112 केंद्रसंचालक व सुमारे 1,716 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक परीरक्षकांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सुरक्षितरीत्या वाहतूक करण्याचे काम काटेकोरपणे पार पाडले आहे.

एकूणच, बैठे पथक, भरारी पथक, झूम वेबकास्ट, ड्रोन चित्रीकरण व कडक पोलीस बंदोबस्त यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्वरित पेपर आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे व भयमुक्त तसेच कॉपीमुक्त वातावरणात सोडवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन…

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आरसेटीच्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहिर