vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

जालना, प्रतिनिधी :- भविष्यातील आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी बचत करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या एकूण वेतनातील किमान 20 टक्के रक्कम विविध योजनांमध्ये गुंतवून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात सायंकाळी 5 वाजता भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा व इतर विविध बचत योजनोविषयक, म्युचुअल फंड तसेच सायबर सुरक्षेवर सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, डाक जीवन विमा विकास अधिकारी संदीप महाजन यांच्यासह एचडीएफसी म्युचुअल फंडचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, बदलत्या काळानुसार आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ पैसे कमावणे पुरेसे नसून, त्याचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षिततेसोबतच चांगला परतावा मिळतो, ज्याचा फायदा कुटुंबाला संकटकाळात किंवा निवृत्तीनंतर होऊ शकतो. तसेच ज्या गोष्टीत आपल्याला धोका पत्करावा लागतो तिथे आपल्याला मोबदलाही जास्त पटीने मिळत असतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डाक जीवन विमा विकास अधिकारी संदीप महाजन यांनी डाक विभागाच्या योजनांची विश्वासार्हता आणि त्यातील पारदर्शकतेवर प्रकाश टाकला. डाक जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि मुदत ठेव योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गुंतवणुकीचे महत्त्व पटवून देण्यात आले. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठेवर आधारित गुंतवणुकीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सायबर सुरक्षावरही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला विविध विभागातील शासकीय अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मी मतदानाचा अधिकार बजावणार’ – स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ..

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी किशन जावळे

अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!