vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

 

सातारा प्रतिनिधी: क्रीडा व युवक संचालनालय,पुणे व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर यांच्याद्वारा प्रथम टप्प्यात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटिंग व कुस्ती, कुरुंदवाड जि. कोल्हापूर येथे वेटलिफ्टिंग व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, याकरिता राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच दि. ३१ डिसेंबर, २०२६ रोजी वय २५ वर्षे आतील असणे आवश्यक आहे. अशी किमान अर्हता असून मागील २ वर्षातील कामगिरीचे मुल्यांमापन करण्यात येईल. तसेच क्रीडा कौशल्य व शारिरीक क्षमता चाचण्या घेऊन, प्रशिक्षणार्थीची निवड अंतिम करण्यात येणार आहे. विभागीय स्तरावरील स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरमध्ये निवड होणा-या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहे व यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे.

तरी वर नमूद केलेल्या अर्हता धारक खेळाडूंनी आपले अर्ज दि. १२ मार्च, २०२६ पर्यंत विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, रेसकोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. ०२३१-२९५११०८) येथे प्रत्यक्ष अथवा dydkop@gmail.com या ई-मेलवर विहीत मुदतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केलेले आहे.

संबंधित पोस्ट

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..

नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ