vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..

नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..

      नवी मुंबई प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘बॅडमिंटन’ क्रीडा स्पर्धांचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.

           या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजनाकरिता नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर-1, वाशी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन सुविधा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष ना.श्री.गणेश नाईक, उपाध्यक्ष श्री. विजय एस.पाटील, सचिव श्री.विजय आर.पाटील यांच्या माध्यमातून निःशुल्क उपलब्ध करुन दिल्याने या स्पर्धा यशस्वी रितीने संपन्न झाल्या.

          या स्पर्धेत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून 14, 17 आणि 19 वर्षाआतील मुलांच्या गटात 130 संघ आणि मुलींच्या गटात 119 संघ असे एकूण 249 संघ सहभागी झाले होते.

          नवी मुंबई मधून बॅडमिंटन या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त खेळातही शाळांचा सहभाग वाढत असून यामध्ये दर्जेदार खेळाडू उदयास येत असल्याचे दिसून येत आहे.

          या स्पर्धेतील मुलांच्या 14 वर्षाखालील गटात पहिली उपांत्य फेरी दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (CBSE), नेरुळ यांच्यात होऊन दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ शाळेच्या संघाने चुरशीच्या लढतीत 2:1 अशा सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी युरो स्कुल, ऐरोली आणि फा.ॲग्नल स्कुल, वाशी यांच्यात होऊन या अत्यंत अटीतटीच्या लढतीत युरो स्कूल ऐरोली शाळेच्या संघांने 2:1 अशा सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

          या गटातील अंतिम सामना युरो स्कूल, ऐरोली आणि दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ यांच्यात होऊन या चुरशीच्या सामन्यात युरो स्कुल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटने सामना जिंकून अजिंक्यपद पटकाविले. हा संघ पुढील विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

          या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (CBSE), नेरुळ आणि फा. ॲग्नल स्कूल, वाशी यामध्ये झालेल्या सामन्यात 2:1 अशा सेटने सामना जिंकत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (CBSE) स्कुल, नेरुळ शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

          या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी युरो स्कुल, ऐरोली आणि डी.ए.व्ही.पब्लिक स्कुल, नेरुळ यांच्यात होऊन यामध्ये युरो स्कुल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा तीन सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

          दुसरी उपांत्य फेरी अव्हलॉन हाईटस इंटरनॅशनल स्कूल, वाशी आणि ए.पी.जे. स्कूल, नेरुळ यांच्यात होऊन या लढतीमध्ये अॅव्हलॉन हाईट्स इंटरनॅशनल स्कुल, वाशी शाळेच्या संघाने 2:0 अशा सरळ सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

          या गटातील अंतिम सामना युरो स्कूल, ऐरोली आणि अॅव्हलॉन हाईट्स इंटरनॅशनल स्कूल, वाशी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात युरो स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:0 अशा सरळ सेटने सामना जिंकून अजिंक्यपद पटकाविले. हा संघ पुढील विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, नेरुळ आणि ए.पी.जे. स्कूल, नेरुळ यामध्ये झालेल्या सामन्यात 2:1 अशा सेटने सामना जिंकत डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, नेरुळ शाळेने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

  या स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल,ऐरोली आणि अॅव्हलॉन हाईट्स इंटरनॅशनल स्कूल, वाशी यांच्यात होऊन डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसरी उपांत्य फेरी ही दिल्ली पब्लिक स्कुल,नेरुळ आणि सेंट झेवियर्स हायस्कूल,ऐरोली यांच्यात होऊन दिल्ली पब्लिक स्कुल,नेरुळ शाळेच्या संघाने 2:0 अशा सरळ सेटने ही लढत जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.  या गटातील अंतिम सामना डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, ऐरोली आणि दिल्ली पब्लिक स्कूल नेरुळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने सामना 2:0 अशा सेटनी जिंकत अंतिम विजेतेपद मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली.

          या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी सेंट झेवियर्स हायस्कूल, ऐरोली आणि अॅव्हलॉन हाईट्स इंटरनॅशनल स्कूल, वाशी यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटमध्ये सामना जिंकून तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

          सदर स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी सेंट मेरीज स्कूल, वाशी आणि युरो स्कुल, ऐरोली यांच्यात होऊन या अत्यंत चुरशीच्या सामन्यात सेंट मेरीज स्कूल, वाशी शाळेच्या संघाने 2:0 अशा सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

          दुसरी उपांत्य फेरी फा.ॲग्नल स्कुल, वाशी आणि न्यु होरायझन स्कॉलर स्कुल, ऐरोली यांच्यात होऊन या लढतीमध्ये फा.ॲग्नल स्कुल, वाशी शाळेच्या संघाने 2:0 अशा सरळ सेटने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

          या गटातील फा.ॲग्नल स्कुल, वाशी आणि सेंट मेरीज स्कूल, वाशी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात फा.ॲग्नल स्कुल वाशी शाळेच्या संघाने 2:0 अशा सेटने सामना जिंकत अजिंक्यपद पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली.

          या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी युरो स्कुल, ऐरोली आणि न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, ऐरोली यामध्ये झालेल्या सामन्यात 2:0 अशा सेटने सामना जिंकत युरो स्कूल, ऐरोली शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

          या स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ आणि एसआयईएस ज्युनिअर कॉलेज, नेरुळ यांच्यात होऊन 2:1 अशा सेटमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी ए.पी.जे.स्कूल, नेरुळ आणि डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल,नेरुळ यांच्यात चुरशीची लढत होऊन ए.पी.जे. स्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने 2:0 अशा सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

          या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ आणि ए.पी.जे.स्कूल, नेरुळ यांच्यात होऊन या सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळ शाळेच्या संघाने 2:0 अशा सरळ सेटने अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली.

          या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल, नेरुळ आणि एसआयईएस ज्युनिअर कॉलेज, नेरुळ यामध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात 2:1 अशा सेटने सामना जिंकत डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल,नेरुळ शाळेचा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

         या स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल, नेरूळ आणि नॉर्थ पॉइंट स्कूल, कोपरखैरणे यांच्यात होऊन या सामन्यात डी.ए.व्ही.पब्लिक स्कूल, नेरूळ शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटमध्ये लढत जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

         दुसरी उपांत्य फेरी दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ आणि ए.पी.जे. स्कूल नेरूळ यांच्यात झालेल्या लढतीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ शाळेच्या संघाने 2:1अशा सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

         या गटातील अंतिम सामना दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ आणि डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, नेरूळ यांच्यात होऊन या अतिशय चुरशीच्या सामन्यात दिल्ली पब्लिक स्कूल,नेरुळ शाळेच्या संघाने 2:1 अशा सेटने सामना जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली.

         या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी ए.पी.जे. स्कूल, नेरुळ आणि नॉर्थ पॉइंट स्कूल, कोपरखैरणे यामध्ये झालेल्या सामन्यात 2:1 अशा सेटनी सामना जिंकत ए.पी.जे. स्कुल, नेरुळ शाळेच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.

        यावर्षीच्या बॅडमिंटन खेळाच्या स्पर्धेत दर्जात्मक वाढ झाल्याचे दिसून आले. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथील बॅडमिंटन सुविधा उपलब्ध करून या स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाकडून करण्यात येऊन स्पर्धा यशस्वीरित्या आयोजनाकरिता प्रमुख पंच श्री. शिवा करियाली, सहाय्यक श्री.संदिप पाटील व अलका करियाली यांचे विशेष सहकार्य लाभले.

       या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रत्येक गटातील अंतिम विजेते संघ पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने पुढील स्पर्धेसाठी नमुंमपा ठरल्याने पुढील स्पर्धेसाठी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा पाटीलRemove term: क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांनीही विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोहद कसाळेची विजयी भरारी; दुहेरी विजेतेपदांसह उपविजेतेपदेही पटकावली

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरवात

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…