vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षणअनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षणअनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, प्रतिनिधी : बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी फोटोशॉप व ग्राफिक्स डिझाईनिंग या विषयांवरील दोन महिन्यांचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

शास्त्रीनगरातील डाटामेट संगणक केंद्र येथे दि. ७ मार्च ते ११ मे दरम्यान हे प्रशिक्षण होईल. इच्छूकांनी दि. ५ मार्च रोजी दु. २ पूर्वी श्री. शिरसाठ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला येथे हजर राहावे. वय १८ ते ४५, जात प्रमाणपत्र, आधारपत्र, पॅनकार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावीत. दि. ६ मार्चला दु. १२ वा. मुलाखती होतील. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, विजय बेदरकर यांच्याशी संपर्क साधावा.

०००

संबंधित पोस्ट

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात’ विदेशी प्रतिनिधींसमोर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत परकीय गुंतवणूक क्षमतेचे सादरीकरण

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा 

बुलढाणा येथे शेळी, कुक्कुट व पशुपालन प्रशिक्षणाचे आयोजन; सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

बेरोजगारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन