vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- पैठण येथे दि.९ ते ११ या कालावधीत संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने वा पायी यात्रा उत्सवाकरीता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पैठणकडे जाणाऱ्या व पैठण कडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-१. शहागड- आपेगाव- पैठणकडून -छत्रपती संभाजीनगरमार्गे जाणारी वाहने शहागड -पाचोड -मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येतील.

२. सोलापूर धुळे एनएच – ५२ महामार्ग कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन -शेकटा -इसारवाडी फाटा- छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगर कडे जाणारी वाहने सोलापूर धुळे एनएच -५२ महामार्ग बीड मार्गे येणारी जड वाहतूक ही एनएच -५२ महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जातील. याचप्रमाणे उलट दिशेने वाहने ये -जा करतील.

३. जालना कडून करमाड -कचनेर फाटा-पोरगाव – बिडकीनचे- शेकटा इसारवाडी फाटा -छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगर कडे जाणारी वाहने ही करमाड -कचनेर फाटा -सोलापूर धुळे एनएच-५२ महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे ने अहिल्यानगरकडे जाईल.या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.

४. छत्रपती संभाजीनगर- बिडकीन -पैठण मार्गे शेवगांव कडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर -वाळूज-गंगापुर-वाळुज मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

५. शेवगाव-पैठण-बिडकिन मार्गे छ.संभाजीनगराकडे येणारी वाहने शेवगाव –नेवासा-गंगापुर-वाळुज मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.

६.इसारवाडी फाटा -शेकटा-बिडकिन-पैठण कडे येणारी जड वाहने इसारवाडी फाटा ए.एस.क्लब छत्रपती संभाजीनगर बीड बायपास मार्गे पाचोड कडे जातील.

०००००

संबंधित पोस्ट

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्र. 129 वरील रस्त तीन महिन्यांसाठी वाहतुकीस बंद

ज्येष्ठ नागरिकांसाठी मालमत्ता करात सवलत’ हा समाज माध्यमांवरून प्रसारित होणारा संदेश फसवणूकीचा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फसवणूक टाळण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क- हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta