vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेस  २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला. 

नवी मुंबई महानगरपालिकेस  २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला.

नवी मुंबई : प्रतिनिधी  : ठाणे  जिल्हा न्यायालयात ठेवण्यात आलेली निवाड्याची रक्कम काढण्यासाठी नवी मुंबई  पालिकेला  प्रतिबंध करावा, या मागणीसाठी प्रतिभा इंडस्ट्रीजच्या  वतीने करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयाने व्याजासह २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला.

त्यामुळे कंत्राट करारनाम्यातील लवाद नेमण्याच्या तरतुदीचा उपयोग करून देयक रक्कम फुगवून ती रक्कम पालिकेकडून वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदारांना यामुळे चाप बसला आहे.पालिका क्षेत्रातील जलवाहिन्या टाकण्याचे काम करणारे कंत्राटदार प्रतिभा इंडस्ट्रीजने कामाची व्याप्ती व भाववाढ अशी काही कारणे देत पालिकेकडे वाढीव रकमेची मागणी केली होती.

आयुक्तांमार्फत त्रयस्थ लवादाची नेमणूक करून त्यांच्यापुढे याबाबतची सुनावणी झाली. सुनावणीअंती लवादामार्फत पारित आदेश प्रतिभा इंडस्ट्रीजच्या बाजूने देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना विशिष्ट रक्कम देण्याचे निवाड्यात नमूद करण्यात आले होते. या निवाड्याला नवी मुंबई पालिकेने ठाणे जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.

संबंधित पोस्ट

डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार येथील बंगल्यासमोर आंदोलन: एसटी कर्मचाऱ्यांचा विषय चिघळला, आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी.

vishwatmaklokswamivarta

अनिल देशमुखांच्या कटोल निवास्थानी ED ची छापा; मनीलॉंडरींग प्रकरणी कागदपत्रांची चौकशी..

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या तीन मंत्र्यांचे गैरव्यवहार लवकरच उघड करणार  भाजपा माजी खासदार – किरीट सोमय्या

vishwatmaklokswamivarta

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी..

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta