vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेस  २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला. 

नवी मुंबई महानगरपालिकेस  २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला.

नवी मुंबई : प्रतिनिधी  : ठाणे  जिल्हा न्यायालयात ठेवण्यात आलेली निवाड्याची रक्कम काढण्यासाठी नवी मुंबई  पालिकेला  प्रतिबंध करावा, या मागणीसाठी प्रतिभा इंडस्ट्रीजच्या  वतीने करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयाने व्याजासह २८ कोटी ७५ लाख ४२ हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला.

त्यामुळे कंत्राट करारनाम्यातील लवाद नेमण्याच्या तरतुदीचा उपयोग करून देयक रक्कम फुगवून ती रक्कम पालिकेकडून वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदारांना यामुळे चाप बसला आहे.पालिका क्षेत्रातील जलवाहिन्या टाकण्याचे काम करणारे कंत्राटदार प्रतिभा इंडस्ट्रीजने कामाची व्याप्ती व भाववाढ अशी काही कारणे देत पालिकेकडे वाढीव रकमेची मागणी केली होती.

आयुक्तांमार्फत त्रयस्थ लवादाची नेमणूक करून त्यांच्यापुढे याबाबतची सुनावणी झाली. सुनावणीअंती लवादामार्फत पारित आदेश प्रतिभा इंडस्ट्रीजच्या बाजूने देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना विशिष्ट रक्कम देण्याचे निवाड्यात नमूद करण्यात आले होते. या निवाड्याला नवी मुंबई पालिकेने ठाणे जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.

संबंधित पोस्ट

लातूर – जाहीराबाद महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी महामार्गावरील पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था उभारावीप्रकाश व्यवस्था सुरु राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावाआमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी…

पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”

मोदी आडनाव अवमाना प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळणार की, शिक्षा कायम राहणार? गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…

दिवाळीचा मुहूर्त साधत उध्दव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, घेणार मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्ली प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

vishwatmaklokswamivarta

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta