vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोदी आडनाव अवमाना प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळणार की, शिक्षा कायम राहणार? गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…

मोदी आडनाव अवमाना प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळणार की, शिक्षा कायम राहणार? गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी  यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय  शुक्रवारी सकाळी 11 वाजता निकाल देणार आहे

मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी  यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय  शुक्रवारी सकाळी 11 वाजता निकाल देणार आहे. हा निर्णय न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक देणार आहेत. दरम्यान न्यायालयानं दोषी ठरल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमध्ये केंद्र सरकारवर आरोप करत गंभीर वक्तव्य केलं होतं. केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, पण ते घाबरत नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी करत आहेत

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. याप्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर सुरत येथील सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानेही त्यांचे सदस्यत्व (खासदार पद) रद्द केले होतं.

राहुल गांधी यांनी सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने अंतिम निर्णय येईपर्यंत शिक्षेला स्थिगिती दिली होती. याप्रकरणात गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असून आज कोर्ट यावर निकाल देणार आहे.

संबंधित पोस्ट

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात बुधवारी सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS)” साठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.

vishwatmaklokswamivarta

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’स उत्साही वातावरणात प्रारंभ !रामायण-महाभारत’ या ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ; भारतीय ज्ञानामुळेच पाश्चात्त्यांची वैज्ञानिक प्रगती ! – डॉ. नीलेश ओक, अमेरिका

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबाग येथील लालबागचा राजा च्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल

vishwatmaklokswamivarta