vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

रायगड – अलिबाग, प्रतिनिधी – देशातील ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान ‘जल महोत्सव’ देशभर राबविण्यात येणार आहे.

पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब राहिलेली नाही तर ती सांस्कृतिक पद्धती म्हणुन पाण्याची जपणूक करावी. पाण्याच्या संवर्धाना साठी स्थानिक पंरपरा यांचा उपयोग मुख्यत: विचारात घ्यावेत. सदर जलमहोत्सवादरम्यान गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे ,प्रत्येक गावात युवकांचा जल संवर्धनासाठी सहभाग घेण्यासाठी यंग बिग्रेडची स्थापना ,जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धानासाठी उपाययोजनांचा समावेश करणेत यावा. ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. 8 ते 22 मार्च 2026 या कालावधीत जलमहोत्सव राबविला जाणार आहे अशी माहिती प्रकल्प संचालक जल जीवन मिशन श्रीम. शुभांगी नाखले यांनी दिली.

 गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे.पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमाचा उद्देश आहे,असे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी सांगितले .

000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश 

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड

vishwatmaklokswamivarta