vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सीविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत आरटीओकडून बाईक जप्त करून चालकावर कारवाई केली जात होती. मात्र आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकांसोबतच बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे रॅपिडो, ओला आणि उबरला देण्यात आलेला बाईक टॅक्सी परवाना तात्पुरता रद्द करण्याचा निर्णयही परिवहन विभागाने घेतला आहे.

रेपिडो ओला उबेर ला कागदपत्रांसाठी मुदत,

सरकारने या कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र त्या कालावधीत कागदपत्रे सादर न केल्याने सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, कंपन्यांना आणखी एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीतही कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल.

फक्त ई-बाईकला होती परवानगी,सरकारने सुरुवातीला पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या उद्देशाने ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली होती. मात्र ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईकऐवजी पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचा वापर सुरू ठेवला. वारंवार कारवाई करूनही नियमांचे पालन होत नसल्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.आता चालकासह मालकावरही गुन्हा

नव्या निर्णयानुसार पेट्रोल बाईक टॅक्सी चालवताना आढळल्यास केवळ चालकावरच नव्हे तर बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच संबंधित बाईकही जप्त केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील बेकायदा बाईक टॅक्सी सेवा बंद होण्याची शक्यता असून हजारो चालकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे- नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

एकल महिलांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन खंबीर; ३० जून रोजी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक वुईके अभियानात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता काम करा

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ..

जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे