vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.
ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती अचूक भरून अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करावा. तसेच Send Back झालेले अर्ज वेळेत दुरुस्त करून पुन्हा सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे पण अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी ती १५ मार्च २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करावीत.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत मनाई आदेश

vishwatmaklokswamivarta