vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन                                               

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्हा तसेच तालुका स्तरावर राबविण्यात येत असून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. अर्ज सेंड बॅक झाल्यास संबंधित त्रुटीची पूर्तता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून 16 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करावी. अपलोड केलेली कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयात आणण्याची आवश्यकता नाही.

ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज पात्र असूनही त्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वाधार योजनेसाठी वर्ग करण्यासाठी सेंड बॅक करण्यात येत आहेत. यासाठी 12 मार्च 2026 ही अंतिम संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त झाल्यानंतर तात्काळ स्वाधार योजनेसाठी अर्ज करावातसेच ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज ‘अप्रुव्ह’ झाला आहे त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती योग्यरीत्या भरावी. संबंधित बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अर्ज ‘अंडरस्कुटने मध्ये असल्यास त्याची तपासणी प्रक्रिया सुरू असल्याचे समजावे.

विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकृत इंस्टाग्राम व फेसबुक पेज samajkalyannanded ला फॉलो करून अद्ययावत माहिती मिळवावी. कोणत्याही अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींशी संपर्क साधू नये. अडचणी असल्यास थेट समाज कल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

vishwatmaklokswamivarta

प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी   

vishwatmaklokswamivarta

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

पालक सचिव यांनी घेतला विकास कामाचा आढावा· पालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ..