vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम

राज्य प्रतिनिधी : अमरावती शहरातील ड्रग्सविरोधी कारवायांवर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील दोन महिन्यांत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला.राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अमरावती शहरात 2021 ते 2026 या कालावधीत ड्रग्ससंबंधित 29 गुन्हे नोंदवून 101 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच नागपूर गेट पोलीस ठाण्याने सुमारे 2 किलो एम.डी. ड्रग्ज जप्त केल्याची माहिती ही त्यांनी दिली.

राज्यात स्थापन करण्यात आलेली अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स सक्रियपणे कार्यरत असून या पथकाला आवश्यक मनुष्यबळ व विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री यांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रग्सविरोधी कारवाया गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी केल्या जात असून या कारवाया सातत्याने आणि आक्रमकपणे सुरू राहतील, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी २६ एप्रिल २०२६ रोजी मतदान-सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक-युवतींना आवाहन 

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

🏵️*फादर्स डे-२१ जून*भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी *फादर्स डे* साजरा 

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta