vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन

सातारा: प्रतिनिधी  दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन विविध योजनांची माहिती व लाभ घेणेसाठी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अर्ज तसेच या पोर्टलवर राज्य व केंद्र शासनाच्या एकुण १७ योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळणार आहे. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांना सदर पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून संस्थांची नोंदणी व नुतणीकरण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर होणार आहे.

दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांचे साक्षमीकरण करणे हा आहे. तरी दिव्यांग व्यक्तींनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती

विरोधकांच्या या असंसदीय वर्तनाचा, चर्चेपासून पळ काढण्याच्या वृत्तीचा आणि NEET वर अपप्रचार करण्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने केली.

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्येस्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कृषियंत्रीकरणाला गती! राज्यात तिन्ही योजनांसाठी १०५६ कोटींचा निधी वितरित कृषिक्षेत्राला आधुनिकतेचे बळ